
जागतिक घडामोडी आणि अमेरिकेच्या फेडरल बँकेकडून व्याजर वाढणवण्याचे मिळथ असलेले संकेत यामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या किमती घसरत आहेत.जागतिक बाजार आणि केवळ मल्टी कमोडिटी एक्सचेंजसह देशांतर्गत बाजारातही सोनाच्या किमती घसरल्या आहेत. तसेच त्यात सातत्याने घसरण होत आहे. गुरुवारी सोन्याचा भाव सहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. स्पॉट सोन्याचे भाव २१ नोव्हेंबरनंतरच्या नीचांकी पातळीवर घसरून ४,०२२.०९ डॉलरवर आले. तर डिलिव्हरीसाठीचे यूएस गोल्ड फ्युचर्स ०.४% ने घसरून ४,११६.२० डॉलरवर आले. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव सहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरला आहे. गुरुवारी एमसीएक्सवर सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीही घसरल्या. सोन्याचे भाव वेगाने ४,००० डॉलर प्रति औंस (सुमारे २८ ग्रॅम) च्या जवळ पोहोचत आहेत. बुधवारच्या सीपीआय अहवालानंतर यूएस डॉलर निर्देशांकात लक्षणीय वाढ झाली नाही.
स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचे भाव घसरले आहेत इतकेच नाही, तर मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वायदे बाजारातही सोने आणि चांदीचे भावही घसरले आहेत. गुरुवारी बाजार उघडताच, ५ ऑगस्ट रोजी मुदत संपणाऱ्या १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत १.४६ लाख रुपयांपर्यंत घसरली. दरम्यान, ३ जुलै रोजी मुदत संपणाऱ्या १ किलो चांदीची किंमत सुमारे २.३० लाखांपर्यंत घसरली. सुरुवातीला त्यात अंदाजे 5,000 ची घसरण झाली. यानंतर, चांदी आता तिच्या उच्चांकापेक्षा 2.26 लाख स्वस्त मिळत आहे.
वायदे बाजारात दुपारी सोने 841 रुपयांच्या घसरणीसह 1,47,176 वर व्यवहार करत होते. तर चांदी1,146 रुपयांच्या घसरणीसह 2,34,359 वर व्यवहार करत आहे. सोन्याच्या घसरणीच्या कारणांचा विचार केल्यास, महागाईचा धोका हे सर्वात मोठे कारण असल्याचे दिसते. मे महिन्यात अमेरिकेतील किरकोळ महागाईने ४.२% चा तीन वर्षांतील उच्चांक गाठला.
डिसेंबरपर्यंत अमेरिकेत व्याजदर वाढण्याची ७०% पेक्षा जास्त शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांना वाटते. दरम्यान, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत केलेल्या घोषणेनंतर तेलाच्या किमती अचानक वाढल्या आहेत. वाढत्या महागाईच्या धोक्यामुळे सोन्याच्या किमतींवर दबाव आला आहे. सोन्याकडे नेहमीच महागाईपासून संरक्षण म्हणून पाहिले जाते, परंतु उच्च धोरणात्मक दरांमुळे मौल्यवान धातूंवर दबाव येत आहे.
तज्ञांच्या मते अमेरिकेतील महागाई आणि आखाती देशातील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने सोन्याच्या दरात लक्षणीय घसरण झाली आहे. ही घसरण गुंतवणूकदारांसाठी खरेदीची संधी निर्माण करू शकते.



























































