
अनेकदा भाजी किंवा मसाले ठेवल्यामुळे त्यावर हळदीचे आणि तेलाचे हट्टी डाग पडतात. हे डाग इतके चिकट असतात की, साबणाने ते सहज निघत नाहीत. मात्र काही घरगुती उपाय करून डब्यांवरील डाग आणि दुर्गंधी दूर करू शकता.
डब्यात 1-2 चमचे बेकिंग सोडा टाका आणि त्यात थोडे व्हिनेगर घाला. हे मिश्रण डब्यात 20 मिनिटे तसेच राहू द्या, त्यानंतर डबा नेहमीप्रमाणे घासून धुवा. यामुळे डब्याचा जुनाट पिवळेपणा दूर होतो.
एका कापलेल्या लिंबाच्या तुकडय़ावर थोडे मीठ ठेवा आणि ते प्लॅस्टिकच्या डब्यातील पिवळसर भागावर व्यवस्थित चोळा. 10 मिनिटांनंतर डबा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.



























































