कॅनडाने इतिहास रचला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॅनडाने आपल्या सलामीच्या सामन्यात बोस्निया आणि हर्जेगोविनाविरुद्ध 1-1 अशी बरोबरी साधली. पण तरीही कॅनडासाठी ही ऐतिहासिक कामगिरी ठरली. कारण वर्ल्ड कपच्या इतिहासात कॅनडाच्या संघाला यावेळी पहिला गुण कमावता आला आहे. संघाची ही तिसरी फिफा विश्वचषक स्पर्धा आहे. आतापर्यंत खेळलेले सर्व सहा सामने त्यांना गमवावे लागले होते.

सामन्याच्या 21 व्या मिनिटाला सेड कोलासिनाकने कॉर्नर किकवर हेडर मारून चेंडू पुढे पाठवला आणि जोवो लुकिचने शानदार हेडर मारून गोल केला. त्यामुळे बोस्नियाला 1-0 अशी आघाडी मिळाली. दुसऱया सत्रामध्ये कॅनडाने खेळाचा वेग वाढवला. बरोबरी साधण्याच्या प्रयत्नात संघाने आक्रमण सुरूच ठेवले. ओलुवासेयीने हेडरद्वारे जवळजवळ बरोबरी साधली होती, पण बचावपटू निकोला कॅटिकने तो अडवला.

जेव्हा असे वाटत होते की बोस्निया सामना जिंकेल, तेव्हा कॅनेडियन प्रशिक्षक जेसी मार्श यांनी एक अशी चाल खेळली जी अगदी योग्य ठरली. 76 व्या मिनिटाला मैदानात आलेल्या साईल लॅरिनने अवघ्या दोन मिनिटांत गोल केला. प्रॉमिस डेव्हिडच्या अप्रतिम पासनंतर लॅरिनने चेंडूवर नियंत्रण मिळवले आणि गोल करून 1-1 अशी बरोबरी साधली.