
केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची हिंदुस्थानचे नवे लष्करप्रमुख (चीफ ऑफ आर्मी स्टाफ) म्हणून नियुक्ती केली आहे. ते माजी अॅडज्युटंट जनरल लेफ्टनंट कृष्ण मोहन सेठ यांचे पुत्र असून ते लष्करातील रणनीती धुरंधर आहेत.
धीरज सेठ यांच्याकडे जवळपास 40 वर्षांचा लष्करी अनुभव आहे. कारण, त्यांना डिसेंबर 1986 मध्ये आर्मर्ड कोअरमध्ये कमिशन मिळाले होते. तेव्हापासून त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी वाळवंट, जम्मू-कश्मीर आणि पश्चिम आघाडीसह अनेक संवेदनशील क्षेत्रांमध्ये कमांड सांभाळली आहे.
धीरज सेठ यांनी दक्षिण-पश्चिम कमांड आणि दक्षिण कमांडचे जीओसी-इन-सी म्हणूनही काम केले आहे. ते पश्चिम आघाडीवर दोन ऑपरेशनल कमांडचे नेतृत्व करणाऱ्या निवडक अधिकाऱयांपैकी एक आहेत. त्यांनी संयुक्त राष्ट्र मिशन (अंगोला), सैन्य मुख्यालय आणि क्षमता विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या पदांवरही काम केले आहे.
सेठ नॅशनल डिफेन्स अपॅडमी (एनडीए) खडकवासला, इंडियन मिलिटरी अपॅडमी (आयएमए), डीएसएससी वेलिंग्टन आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी ज्युनियर कमांड कोर्समध्ये प्रथम क्रमांक आणि डीएसएससीमध्ये बेस्ट ऑल राऊंड स्टुडंट ऑफिसर मेडल मिळवलेले आहे.
शिक्षण
- राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए)
- हिंदुस्थानी लष्करी अकादमी (आयएमए)
- संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय
- राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय
प्रमुख कमांड्स
- दक्षिणी कमांडचे जीओसी-इन-सी
- जीओसी-इन-सी, दक्षिण पश्चिम कमांड
- कमांडर, 21 वे स्ट्राइक कॉर्प्स
- जीओसी, दिल्ली क्षेत्र
सन्मान
- परम विशिष्ट सेवा पदक (पीव्हीएसएम)
- उत्तम युद्ध सेवा पदक (यूवायएसएम)
- अति विशिष्ठ सेवा पदक (एव्हीएसएम)
























































