आसामात भयंकर दुर्घटना, वायुदलाचे विमान कोसळले; 5 जवान शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसाममधील जोरहाट येथे उतरताना हिंदुस्थानी हवाई दलाच्या मालवाहतूक विमानाला शनिवारी भयंकर अपघात झाला. या अपघातात दोन अधिकाऱ्यांसह पाच जवान शहीद झाले, तर एक गंभीर जखमी झाला आहे. जखमी जवानाची प्रकृती चिंताजनक आहे.

अपघातग्रस्त अन्तोनोव एएन-32 हे विमान रशियन बनावटीचे होते. लष्करी साहित्याने भरलेल्या या विमानाने सकाळी दहा वाजता जोरहाटहून चाबुआसाठी उड्डाण केले. मात्र, उड्डाणानंतर काही वेळातच विमानाने लँडिंगची विनंती केली. लँडिंगची प्रक्रिया सुरू असतानाच विमान धावपट्टीला समांतर असलेला टॅक्सी वे ओलांडून पुढे गेले आणि कोसळले.