T20 Mumbai League 2026 – मराठाच ‘रॉयल्स’, सलग दुसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी, आर्क्स अंधेरीला उपविजेतेपद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा रॉयल्स संघाने आर्क्स अंधेरी संघाचा 8 धावांनी पराभव करत टी20 मुंबई लीगचे विजेतेपद पटकावले. सिद्धेश लाड याच्या नेतृत्वाखाली मराठा रॉयल्स संघाने सलग दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केली. तुषार देशपांडे याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

वानखेडे मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत आर्क्स अंधेरीने नाणेफेक जिंकून मराठा रॉयल्स संघाला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. मराठा रॉयल्सने चिन्मय सुतारच्या 61 धावा आणि सिद्धेश लाडच्या 33 धावांच्या बळावर 20 षटकात 154 धावांपर्यंत मजल मारली. आर्क्स अंधेरीकडून अर्जुन तेंडुलकरने 2 विकेट्स घेतल्या. त्यानंतर आर्क्स अंधेरीचा डाव 8 बाद 146 धावांवर रोखत 8 धावांनी विजय मिळवला आणि सलग दुसऱ्यांदा चषक उंचावला.