अमेरिकेची बालोगन धडाडली, फोलारिन बालोगनचे दोन दणदणीत गोल; पॅराग्वेवर 4-1 असा विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तमाम विश्वाचे लक्ष ज्यांच्यावर लागले होते, त्या अमेरिकेने पहिल्या सामन्यातच गोलधडाका दाखवून दिला. फोलारिन बालोगनने दोन गोल करत अमेरिकेच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला, त्यामुळे यजमानांनी पॅराग्वेवर   4-1 असा दणदणीत विजय साकारला.

आत्मघाती गोलने सुरुवात

अमेरिकेच्या नावावर पहिल्या गोलची नोंद सातव्या मिनिटाला झाली. पण हा गोल अमेरिका नाही, तर पॅराग्वेच्या खेळाडूनेच केला. सामन्याच्या सातव्या मिनिटाला पॅराग्वेच्या डॅमियन बोबाडिलाने आत्मघाती गोल केला, ज्यामुळे अमेरिकेला 1-0 अशी आघाडी मिळाली.

बालोगनचा धडाका

सामन्याच्या 31व्या मिनिटाला फोलारिन बालोगनने अमेरिकेची आघाडी दुप्पट केली. फोलारिनच्या अप्रतिम कौशल्यासमोर पॅराग्वेचा बचाव पूर्णपणे हतबल दिसत होता. पहिल्या सत्राच्या अतिरिक्त वेळेत फोलारिनने पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी करत अमेरिकेला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. फोलारिन बालोगुन 1930 नंतर फिफा विश्वचषकात दोन गोल करणारा पहिला अमेरिकन खेळाडू ठरला.

पॅराग्वेचे पुनरागमन

दुसऱया सत्रामध्ये पॅराग्वेने आक्रमक खेळ करत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. सामन्याच्या 73 व्या मिनिटाला संघाला यश मिळाले. पॅराग्वेचा बदली खेळाडू मॉरिसिओने संघासाठी पहिला गोल केला. यानंतर अमेरिकेने आपला आक्रमकपणा वाढवला आणि पॅराग्वेच्या बचावावर दबाव टाकला.

अमेरिकेचा गोल चौकार

90 मिनिटांनंतर स्टॉपेज टाइममध्ये जिओव्हानी रेनाने गोल करत अमेरिकेची आघाडी 4-1 अशी वाढवली. अंतिम शिट्टी वाजण्यापूर्वी त्याने पुन्हा एकदा पॅराग्वेचा बचाव भेदला आणि अमेरिकेचा दणदणीत विजय निश्चित केला. या विजयासह अमेरिकेने 3 गुण कमावले.