
ईपीएफओने लग्न आणि मुलांच्या शिक्षणासाठी पीएफमधून पैसे काढण्याची प्रक्रिया अजून सोपी केली आहे. सदस्य आता ऑनलाइन ईपीएफओ पोर्टलच्या माध्यमातून अॅडव्हान्स रक्कम काढू शकतात. त्यासाठी अर्थातच नियम आणि अटींचे पालन करावे लागणार आहे.
ईपीएफओने जारी केलेल्या व्हिडीओनुसार, ईपीएफ सदस्य कुटुंबातील सदस्य, ज्यात मुलगा, मुलगी, भाऊ अथवा बहीण यांच्या लग्नासाठी पीएफची रक्कम काढू शकतात. याशिवाय मुलांच्या शिक्षणासाठी या सुविधेचा लाभ घेता येतो. पण त्यासाठी काही अटी आणि शर्ती आहेत. नियमांचे पालन सदस्यांना करावे लागेल. व्हिडीओनुसार, पीएफची रक्कम काढण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाइन आणि सोपी झाली आहे. कर्मचाऱयांना पीएफ काढण्यासाठी आधार, पॅन आणि बँक खात्याची लिंक असणे आवश्यक आहे.





























































