तारापूरचा पाणीपुरवठा आज नऊ तास बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या तारापूर जलशुद्धीकरण केंद्रात मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे शुक्रवारी १२ जून रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तब्बल नऊ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसी प्रशासनाने दिली.

दुरुस्तीच्या कामामुळे तारापूर औद्योगिक क्षेत्रासह जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या तसेच नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतरही एक ते दोन दिवस पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता असल्याचे एमआयडीसी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिक व औद्योगिक ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.