
लांबलेला पाऊस.. त्यात आग ओकणाऱ्या सूर्यामुळे प्रचंड बाष्पीभवन होऊन अंबरनाथच्या चिखलोली धरणाने तळ गाठला असून धरण क्षेत्रातील जमिनीला भयंकर तडे गेले आहेत. अजून काही दिवस पावसाने अशीच दडी मारल्यास पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होणार असल्याने पाणीपुरवठा करताना प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. हे संकट ओळखून प्रशासनाने आतापासूनच कडक पावले उच्चलत अंबरनाथकरांना आठवड्यातून तीन दिवस पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहराच्या पूर्व भागाला टंचाईचा फटका बसणार आहे.
अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली जलसाठ्यांमध्येही झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. या धरणातून अंबरनाथच्या पूर्व भागातील शिवाजीनगर, महालक्ष्मी नगर, आंबेडकरनगर, श्रीकृष्णनगर आणि धरण क्षेत्रातील जमिनीला कडक उन्हाने भेगा अंबरनाथकरांना आठवड्यातून तीनच दिवस पाणी नवलेनगर परिसरातील सुमारे 50 हजारांहून अधिक नागरिकांना दररोज 6 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. मात्र सध्या वाढत्या तापमानामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने आटत असल्याने आगामी दिवसांत या परिसरातील रहिवाशांना पाणीटंचाईचा मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.
प्रशासनाचे टेन्शन वाढले
धरणात सध्या उपलब्ध असलेला जलसाठा ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरवणे अपेक्षित असल्याने प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे. सध्या अंबरनाथ शहराला बॅरेज धरणातून 56 दशलक्ष लिटर, एमआयडीसीकडून 22 दशलक्ष लिटर आणि चिखलोली धरणातून 6 दशलक्ष लिटर असा एकूण 84 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात आहे.


























































