
जामनेरची मावशी म्हणते, शिवसेनेकडे ‘राडा’ करण्याची ताकद नाही. सर्व संपलंय. अगं मावशे, सगळं संपलंय. मग गद्दारांच्या सुरक्षेसाठी इतका सशस्त्र बंदोबस्त का? तोही जनतेच्या पैशांनी. स्वतः मावशीच्या बंदोबस्ताला पोलीस फौजफाटा आहे. भ्रष्टाचाऱ्यांना आणि गद्दारांना भय वाटते हे चांगले आहे. तरीही एक दिवस मावशे, तुझे भर बाजारात वस्त्रहरण होणारच आहे. झुरळांनाही घाबरणारे तुम्ही, मर्दानगीचा आवेश कसला आणता? कुंभमेळ्यात, राममंदिरात दरोडे घालणारे तुम्ही, नैतिकतेच्या गप्पा कसल्या मारता? तुम्ही सत्तेचा अमरपट्टा बांधून आलेला नाहीत हे लक्षात ठेवा. राहिला विषय शिवसेनेच्या नव्या गद्दारांचा. त्यांचे ‘ऑपरेशन तुडवा’ होणारच होणार!
तमाशा म्हणजे महाराष्ट्राच्या लोककलेचे महत्त्वाचे अंग आहे. तमाशात गणगवळण असते. त्यात एक मावशी असते. अनेकदा या मावशीची भूमिका एखादा नाच्याच साडी नेसून करत असतो. महाराष्ट्राचे सरकार हा एक भ्रष्ट पैशांचा तमाशा असून गिरीश महाजन हे मावशीची अजरामर भूमिका सध्या वठवत आहेत. ही मावशी सर्वच बाबतीत ‘भ्रष्ट’ असल्याने तिला मंत्रीपदाची साडीचोळी मिळत असते. सत्तेच्या साडीचोळीमुळे या नाच्यामध्ये आपण ‘मर्द’ असल्याची भावना उद्दीपित होते व त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्यातले स्थैर्य नष्ट होते. शिवसेनेतल्या सहा बेइमान खासदारांनी मिंधे गटाचा मार्ग स्वीकारला. शिवसेना म्हणे काँग्रेस पक्षात विलीन होईल या चिंतेने त्यांनी मिंध्यांचा मार्ग स्वीकारला असे या मावशीचे मत आहे. मावशीला काँग्रेसचा इतका तिटकारा आहे हे समजू शकतो, पण आज त्यांच्या भाजपमध्ये दिल्लीत व महाराष्ट्रातही एकजात सर्व काँग्रेसवाल्यांना सामावून घेतले आहे. त्यांना मानसन्मान दिला आहे आणि भाजपचे मूळ कार्यकर्ते मात्र काल आलेल्या काँग्रेसवाल्यांची उष्टी, खरकटी काढत आहेत. कोणी सतरंज्या उचलत आहेत. हिंदुत्वाला, वीर सावरकरांना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शिव्यांची लाखोली वाहणारे नितेश राणे, विखे-पाटील यांच्यासारखे असंख्य लोक मावशीबाईंच्या मांडीवर बसले आहेत. वीर सावरकरांना ‘माफीवीर’, संघाला ‘हाफ चड्डी’ वगैरे म्हणणारे हे लोक आज भाजपच्या अस्मितेचे प्रतीक बनले आहेत. जामनेरच्या मावशीबाईंना हे काय माहीत नाही? भाजपची एक प्रकारे काँग्रेस झाली आहे व मावशीसारखे नाचे या काँग्रेस विचाराचे वाहक बनले आहेत. त्यामुळे मावशीने काँग्रेसचा राग करावा हे बरे नाही. काँग्रेसचेच धुरंधर लोक फडणवीस मंत्रिमंडळात बसले आहेत व सरकार चालवत आहेत. मावशीला इतिहास माहीत असायला हवा की, काँग्रेस पक्षाने
स्वातंत्र्य लढ्याचा वणवा
पेटवला. काँग्रेसचे लोक तुरुंगात गेले. अनेकांनी हौतात्म्य पत्करले. त्यांनी देशासाठी संपत्तीचा त्याग केला. तेव्हा कोठे देशाला स्वातंत्र्य मिळाले. मावशीचे पूर्वज या राष्ट्रीय लढ्यात कोठेच नव्हते. उलट ते स्वातंत्र्य सैनिकांची ‘मुखबिरी’ करीत होते. म्हणजे इंग्रजांना चळवळीची खबर देऊन इनामे मिळवीत होते. चापेकर बंधूंची खबर इंग्रजांना देणारे व या तीन क्रांतिकारकांना फासावर चढवण्यास हातभार लावणारे ‘मुखबीर’ हे मावशीचे पूर्वज होते, ते काँग्रेसवाले नव्हते. लोकमान्य टिळक काँग्रेसचे जहाल पुढारी होते व चापेकर बंधू टिळकभक्त होते. अशा अनेक क्रांतिकारी घटनांनी काँग्रेसचा इतिहास सजला आहे. मावशीच्या पूर्वजांबद्दल अशी काही माहिती असेल तर सांगावी. काँग्रेस स्वातंत्र्य लढ्यात नसती तर मावशी व त्यांचे लोक आजन्म इंग्रजांची गुलामी, हेरगिरी करत राहिले असते आणि इंग्रजांच्या तुकड्यावर गुलामीचे जिणे जगण्यात त्यांनी आनंद मानला असता. महाराष्ट्राच्या राजकारणाचा ‘मावशी’ टाईप लोकांनी कोठा केला आहे. येथे विचार, भावना, नीतिमत्तेला किंमत उरलेली नाही. दौलतजादा हीच त्यांची नशा आहे. या कोठ्यावर नाचणाऱ्या मावश्या व अक्काबाई मंडळींनी राज्य नासवले आहे. शिवसेनेचे सहा खासदार बेइमान झाले. ते मशाल चिन्हावर आणि उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर निवडून आले. त्यांच्या प्रचारासाठी जामनेरच्या मावशीचा ‘नाच’ कार्यक्रम ठेवला नव्हता. शिवसैनिकांनी मेहनत करून त्यांना निवडून आणले. उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेसच्या मांडीवर बसणार या चिंतेने सहा खासदार बेइमान झाले हे मावशीचे म्हणणे बिनडोकपणाचे आहे. मुळात या सगळ्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. त्या आघाडीत काँग्रेस हा महत्त्वाचा घटक आहे. व्यासपीठावर
प्रचारात काँग्रेस
होती. शिर्डीत तर काँग्रेस पुढारी बाळासाहेब थोरात यांनी ‘उंदीर’चौरेच्या विजयासाठी मोठे परिश्रम घेतले. सर्वत्रच या लोकांनी काँग्रेसची मदत घेतली. मग आता अचानक काँग्रेस चिंतेचे जंतू त्यांच्या अंगात का वळवळू लागले व ते जंतू जामनेरच्या मावशीला का गुदगुल्या करीत आहेत? पोलीस बंदोबस्तात मावशी नसलेल्या मिश्यांना पीळ देत फिरते. मावशी एक नंबरची डरपोक आहे. सत्ता नसेल, पोलिसांची कवचकुंडले नसतील तर मावशी विचारधारेची ऐशी की तैशी करून पक्षांतर केल्याशिवाय राहणार नाही. नव्हे, काँग्रेस, राष्ट्रवादीने गच्च फुगलेला भाजप 75 टक्के रिकामा होईल. सहा खासदारांना म्हणे, ‘काँग्रेस’ विचार मान्य नाही. मग मिंधे हे काय ऑरिस्टॉटल, सॉक्रेटिस, आचार्य रजनीश यांच्यासारखे विचारवंत आहेत काय? भ्रष्टाचारातला पैसा वापरून माणसे विकत घ्यायची हीच यांची विचारधारा. मुळात सहापैकी ‘पाच’ हे काँग्रेसच्याच अडगळीत पडलेले लोक होते. ते उद्धव ठाकरे यांच्या चरणाशी आले व खासदार झाले. त्यामुळे त्यांचा भाव आज वधारला व पन्नास कोटींत ते विकले गेले. आता ते बिळात लपून बसले. पोलिसांनी त्यांना विशेष सुरक्षा पुरवली. जामनेरची मावशी म्हणते, शिवसेनेकडे ‘राडा’ करण्याची ताकद नाही. सर्व संपलंय. अगं मावशे, सगळं संपलंय. मग गद्दारांच्या सुरक्षेसाठी इतका सशस्त्र बंदोबस्त का? तोही जनतेच्या पैशांनी. स्वतः मावशीच्या बंदोबस्ताला पोलीस फौजफाटा आहे. भ्रष्टाचाऱ्यांना आणि गद्दारांना भय वाटते हे चांगले आहे. तरीही एक दिवस मावशे, तुझे भर बाजारात वस्त्रहरण होणारच आहे. झुरळांनाही घाबरणारे तुम्ही, मर्दानगीचा आवेश कसला आणता? कुंभमेळ्यात, राममंदिरात दरोडे घालणारे तुम्ही, नैतिकतेच्या गप्पा कसल्या मारता? तुम्ही सत्तेचा अमरपट्टा बांधून आलेला नाहीत हे लक्षात ठेवा. राहिला विषय शिवसेनेच्या नव्या गद्दारांचा. त्यांचे ‘ऑपरेशन तुडवा’ होणारच होणार!































































