‘एसआयटी’चा अहवाल चोरी होऊ नये म्हणजे मिळवले, अखिलेश यादव यांचा योगी सरकारला टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी आणि दानाच्या स्वरूपात मिळालेल्या वस्तूंमध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार उघड झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या एसआयटीवरून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारला टोला लगावला आहे. एसआयटीचा अहवाल चोरीला जाऊ नये याची खबरदारी एसआयटीने घ्यावी, असा खोचक सल्ला अखिलेश यादव यांनी योगी सरकारला दिला आहे.

राम मंदिरात भाविकांनी दिलेल्या देणगीच्या रकमेत मोठय़ा प्रमाणात गैरप्रकार आढळून आला आहे. यावरून अखिलेश यादव यांनी टीका करताना सांगितले की, एसआयटीने सावध राहण्याची गरज आहे. सध्या पुरावे नष्ट करण्यात येत आहेत. पुढे आणखी 15 दिवस प्रतीक्षा करा, असे सांगण्यात येईल. सध्याच्या घडामोडी पाहता एसआयटीचा अहवालदेखील चोरी होऊ शकतो. त्यामुळे एसआयटीने जास्त काळजी घेण्याची गरज आहे, असा टोला अखिलेश यादव यांनी लगावला.