बोनी कपूर यांच्या घरी लग्नाची लगबग; अंशुला कपूरच्या प्री-वेडिंग सोहळ्यांना सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूड अभिनेता अर्जून कपूरच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण असून त्याची बहीण अंशुला कपूर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अंशुलाच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून नुकतेच ‘माता की चौकी’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोहळ्यात अंशुला आणि तिचा होणारा पती रोहन ठक्कर यांनी एकत्र पूजा आणि आरती केली. विशेष प्रसंगासाठी अंशुलाने आकर्षक गोल्डन लेहेंगा परिधान केला होता, तर पारंपरिक दागिन्यांनी तिच्या लूकमध्ये अधिक भर घातली होती.

माता की चौकीच्या कार्यक्रमात संपूर्ण कपूर कुटुंब उपस्थित होते. बोनी कपूर, जान्हवी कपूर, खुशी कपूर, संजय कपूर, शनाया कपूर यांनी सोहळ्याला हजेरी लावली होती. शनायाने या खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर ते मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. अंशुला कपूर आणि रोहन ठक्कर यांचा ऑक्टोबर 2025 मध्ये साखरपुडा झाला होता. दोघांची ओळख एका डेटिंग अॅपद्वारे झाली आणि 2022 पासून ते एकमेकांना डेट करत आहेत. आता लवकरच हे जोडपे विवाहबंधनात अडकणार असून कपूर कुटुंबात लग्नाच्या तयारीला वेग आला आहे. अंशुलाच्या लग्नाच्या बातमीमुळे कपूर कुटुंबाचे चाहतेही उत्साहित झाले असून आगामी विवाहसोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.