ट्रम्प यांना धक्का! इराणविरोधात लष्करी कारवाई रोखणारा ठराव सिनेटमध्ये मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकी संसदेच्या वरिष्ठ सभागृहाने इराणविरुद्धची लष्करी कारवाई थांबविण्यासाठीचा ठराव मंजूर केला आहे. 50 विरुद्ध 48 मतांनी मंगळवारी हा ठराव मंजूर झाला. विशेष म्हणजे, ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या चार खासदारांनी या ठरावाच्या बाजूने मतदान केले. हा ट्रम्प यांना मोठा धक्का मानला जात आहे.

ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या खासदारांबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे ट्रम्प यांनी रिपब्लिकन खासदारांना दिखाऊपणा करणारे म्हणत त्यांचे कृत्य देशभक्ती दर्शवणारे नाही, अशी टीका केली आहे.