
स्मार्ट मीटर लावण्यास विरोध करणारे पत्र वरिष्ठांना न कळवता परस्पर अदानी कंपनीला पाठवले म्हणून महावितरणच्या पालघर मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता मदन सांगळे यांना आज तडकाफडकी निलंबित करण्यात आले. महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या स्वाक्षरीने निलंबनाचे हे आदेश जारी करण्यात आले.
पालघर मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता मदन सांगळे यांनी याची गंभीर दखल घेत दोन दिवसांपूर्वी अदानी कंपनीला पत्र पाठवले. यापुढे घरगुती ग्राहकाचे वीज मीटर पूर्व संमतीपत्र न घेता परस्पर बदलल्यास त्यातून होणारे वाद, आंदोलने याची जबाबदारी आपल्यावर राहील, असे या पत्रात नमूद करण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.




























































