
कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईवरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी आज कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना घेरले. तुम्ही काहीही सांगायचे आणि आम्ही ऐकून घ्यायचे का, हेक्टरी 200-300 रुपये देउैन तोंडाला पाने पुसणार का? अशा शब्दांत शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांनी आज कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे विचारणा केली.
कोकणातील आंबा उत्पादकांना 1 लाख 70 हजार आणि काजू उत्पादकांना 1 लाख 20 हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी तारांकित प्रश्नाद्वारे विधानसभेत करण्यात आली होती. त्यावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या प्रश्नी कोकणातील लोकप्रतिनिधींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत बैठक घेऊ, असे आश्वासन दिले. मात्र, या आश्वासनामुळे समाधान न झाल्याने कोकणातील सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी जोरदार गोंधळ घातला.
त्यावर कृषिमंत्री भरणे यांनी मदतीचा तपशील सादर करत कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांना नुकसानभरपाईपोटी एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे 209 कोटी रुपयांची रक्कम निश्चित केली आहे. ठाणे जिल्ह्यात 4 हजार 669 शेतकऱ्या ना 295 हेक्टरसाठी चार कोटी 84 लाख, पालघर जिह्यात 17 हजार 612 शेतकऱ्या ना 2 जार 868 हेक्टर क्षेत्रासाठी सहा कोटी 47 लाख, रायगड जिह्यात 17 हजार शेतकऱ्या ना 8 हजार 987 हेक्टर क्षेत्रासाठी 20 कोटी 28 लाख, रत्नागिरी जिल्ह्यातील 52 हजार 628 शेतकऱ्या ना 43 हजार, 662 हेक्टर क्षेत्रासाठी असे 98 कोटी 45 लाख रुपये. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 42 हजार 322 शेतकऱ्या ना 34 हजार 728 हेक्टर क्षेत्रासाठी 79 कोटी पाच लाख असे 209 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. मदत पुनर्वसन विभागाला हा प्रस्ताव दाखल केला आहे. लवकरात लवकर हा निधी मिळेल. फळ पिक विमा योजनेअंतर्गत 71,854 शेतकऱ्या ना 217 कोटी रुपयांची नुकसानभरपाई विमा कंपनीकडून मंजूर झालेले आहे, तीही लवकरच ही रक्कम शेतकऱ्या ना दिली जाईल, असे आश्वासन दिले.


























































