ट्रेंड – आलिशान घराची भुरळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इतिका मेहता नावाच्या एका माजी हवाई सुंदरीने तिच्या दुबईमधील आलिशान घराचा व्हिडीओ तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. दुबईमधले हे घर मोठ्या खिडक्या, मरीनाचे दृश्य, समुद्रकिनाऱयावरील सूर्यास्त आणि भरपूर नैसर्गिक प्रकाश देणारे आहे. हे अपार्टमेंट अत्यंत सुसज्ज आहे. नेटकरी तिच्या घराच्या प्रेमात पडले आहेत. घर असावे तर असे अशा प्रतिक्रिया आणि लाईक्स वर्षाव या व्हिडीओवर होत आहे. इतिका म्हणते, एका महिन्यापूर्वी हे केवळ एक सामान्य अपार्टमेंट होते, आज हे आमचे घर बनले आहे. ‘‘आम्ही हळूहळू या जागेत आमच्या आवडीच्या आणि आठवणींच्या गोष्टींची भर घालत आहोत.