
एखाद्या व्यक्तीसोबत चॅटिंग करायची असेल तर सर्वात आधी त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर सेव्ह करावा लागतो, परंतु आता तसे करण्याची गरज नाही. मोबाईल नंबर सेव्ह न करताही चॅटिंग करण्याची सुविधा युजर्सला मिळणार आहे. मेटाची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपने युजरनेम फीचर लाँच करत असल्याची घोषणा केली आहे.
व्हॉट्सअॅप पंपनीने 29 जूनपासून जगभरात युजरनेमची बुकिंग सुरू केली आहे. ही सुविधा एकाच वेळी सर्व युजर्संना मिळणार नाही. येत्या काही महिन्यांत हळूहळू सर्व देशांमध्ये ही सुविधा सुरू केली जाईल. जेव्हा हे फीचर युजर्सच्या परिसरात उपलब्ध होईल, तेव्हा त्याला व्हॉट्सअॅपमध्ये नोटिफिकेशन मिळेल. त्यामुळे आता मोबाईल नंबरऐवजी फक्त युजरनेम शेअर करता येईल. त्यावरच चॅटिंग करता येईल.




























































