हे करून पहा – पावसाळ्यात या गोष्टींकडे लक्ष द्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अचानक सुरू झालेला पाऊस आणि कपाटातून कुबट वास येणं ही खूप सामान्य समस्या आहे. यासाठी कपाटात वर्तमानपत्र ठेवा. कापूर किंवा सिलिका जेल पाउच वापरा. कडुलिंबाची पाने ठेवली तर बुरशी आणि कीटक कमी होण्यास मदत होते. कपडे पूर्ण कोरडे झाल्यावरच कपाटात ठेवा. यामुळे कपडय़ांमध्ये ओल आणि दुर्गंधी कमी राहते.

पावसाळ्यात जाड कपडय़ांपेक्षा हलके आणि पटकन सुकणारे कपडे वापरणं अधिक सोयीचं ठरतं. म्हणून, कॉटनपेक्षा ड्राय-फिट किंवा हलक्या फॅब्रिकचे कपडे वापरा. अतिरिक्त टॉवेल आणि फडकी घरात ठेवा.