महाराष्ट्रात देवाभाऊंमुळेच गुन्हेगारी वाढली असे का नाही म्हणत? अंबादास दानवे यांनी भाजपला धू धू धुतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चापलुसी करण्यासाठी सर्व श्रेय त्यांनाच देण्याचा प्रयत्न भाजप आमदारांकडून सुरू आहे. मग राज्यात वाढलेली गुन्हेगारी देवाभाऊंमुळेच वाढली असे का नाही म्हणत असा सणसणीत टोला लगावत शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत फडणवीसांची चापलुसी करणाऱ्या भाजप आमदारांना धू धू धुतले.

सध्या कोणतीही गोष्ट झाली की भाजपचे लोपं त्याचे श्रेय देवाभाऊंना देऊन मोकळे होतात. ही चापलुसीची हद्द आहे. बाकीच्या गोष्टीच जर देवाभाऊला क्रेडिट देता तर वाढत्या गुन्हेगारीचे क्रेडिटही देवाभाऊंना दिलं पाहिजे. भाजपने हे सगळं कबूल केलं पाहिजे, असे शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी सुनावत भाजपची बोलती बंद केली.

सभागृहात कोणी आलं की देवाभाऊनी असं केलं, आता कोणतरी ठराव मांडला की, देवाभाऊमुळं कांबळेला शिक्षा झाली मग देवाभाऊमुळे कांबळेने गुन्हा केला असे का नाही म्हणत? देवाभाऊमुळे गुन्हेगार फोफोवले असे का नाही म्हणत? गुन्हेगारी महाराष्ट्रात वाढली ती देवाभाऊमुळे वाढली असे का नाही म्हणत? ही चापलुसीची हद्द आहे. कोणी येतं देवाभाऊमुळे असं झालं, देवाभाऊ काम झाले, देवाभाऊ कोर्टात उभे राहिले का? मला असं वाटतं जर आपण बाकीच्या गोष्टीचे जर देवाभाऊला व्रेडिट देतो तर या गोष्टीचे सुद्धा क्रेडिट देवाभाऊंना दिलं पाहिजे. हे सगळं कबूल केलं पाहिजे. म्हणून हे जर देवाभाऊनी केलं तर हे पण देवाभाऊनी केलं, असं म्हटले पाहिजे.

राज्यात गुड गव्हर्नन्स कुठेय?

झिरो टॉलरन्स आपण म्हणतो, गुड गव्हर्नन्स आपण म्हणतो. मात्र, सगळय़ात जास्त लक्षवेधी सत्ताधारी पक्षाचे लोक मांडतात. सगळय़ात जास्त सत्ताधारी पक्षाचे लोक मंत्र्यावर आरोप करतात. सगळय़ात जास्त लोक त्या ब्लड बँकेवर आरोप करतात. तर मग त्यांना फासावर का नाही चढवत देवाभाऊ? याला देवाभाऊ जबाबदार नाही, मग शिक्षा दिली तर देवाभाऊ आणि गुन्हे झाले तर देवाभाऊ नाही. देवाभाऊ गृहमंत्री आहेत या राज्याचे, हे पण कबूल केलं पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की या सगळय़ाला आपण गुड गव्हर्नन्स नाव देतो; परंतु आत्ताच्या घडीला गुड गव्हर्नन्स नाही, असे अंबादास दानवे यांनी ठणकावून सांगितले.