मुंबईतील सर्व मॅनहोल्सचे तातडीने मॅपिंग करावे, शिवसेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील सर्व 1,03,926 मॅनहोल्सचे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘मॅपिंग’ करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेने केली. तसेच मुंबईतील अनेक मॅनहोल्सवर अद्याप संरक्षक जाळ्या बसवलेल्या नाहीत. त्या जाळ्या युद्धपातळीवर बसवण्याचे काम पूर्ण करण्यात यावे, अन्यथा मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.

शिवसेना नगरसेवक अंकित प्रभू यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना मॅनहोलसंबंधी मागण्यांचे निवेदन दिले आहे. नवीन तंत्रज्ञान वापरून सर्व मॅनहोल्सचा एक अद्ययावत डेटाबेस उपलब्ध करण्यात यावा, जेणेकरून तेथील संबंधित अधिकाऱयांना त्याची सद्यस्थिती त्वरित समजेल. डेडलाईन उलटूनही कामे अपूर्ण ठेवणाऱया आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणाऱया संबंधित कंत्राटदारांवर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी अंकित प्रभू यांनी केली.