
पक्षफोडीचा महाराष्ट्र पॅटर्न पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळत आहे. तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटाने पक्षाचे कोलकाता येथील मुख्यालय बळकाविले. मुख्यालयाचे कुलूप बदलले आणि नवे पोस्टर्स झळकविले, मात्र त्यांनी मुख्यालयाच्या आत असलेले तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांचे छायाचित्र व कटआऊट हटविले नाही.
बंडखोर गटाचे नेते ऋतव्रत बॅनर्जी हे पक्षाचे वरिष्ठ नेत्यांसह तृणमूलच्या मुख्यालयात पोहोचले. तेथे त्यांनी बैठक घेऊन आमचाच गट मूळ तृणमूल काँग्रेस असल्याचा दावा केला. पक्षाचे सर्व काम येथूनच चालेल, असे त्यांनी जाहीर केले.
प्रशासन, पोलिसांवर आरोप ममता बॅनर्जी यांचे समर्थक व वरिष्ठ नेते कुणाल घोष यांना कार्यालयात दाखल होता आले नाही. यावर कुणाल घोष म्हणाले की, दावा करणारे नेते अपक्ष म्हणून निवडणूक जिंकलेले नाहीत. पक्ष कार्यालय राज्य प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने बळकावल्याचा आरोपही घोष यांनी केला.






























































