
पाऊस सुरू होऊन आठवडा उलटत नाही तोच माळशेज घाटात नव्याने बनवलेल्या रस्त्याला तडे गेले आहेत. मोरोशीजवळ देखील रस्त्याला भेगा पडल्या असून अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला असून रस्त्यालगतच्या मातीचा भराव काढल्याने त्यातील झाडे कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. रस्त्याला तडे गेल्याची कबुली तहसीलदार अभिजित देशमुख यांनीही दिली आहे. घाटातील रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी खर्च केलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेले असून एखादी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवाल मुरबाडवासीयांनी केला आहे.
माळशेज घाटातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर सिमेंट काँक्रीटचा रस्ता नव्याने बनवला आहे. या रस्त्यालगत अनेक मोठे वृक्ष असून त्याखालील माती काढल्याने हे वृक्ष कोसळल्यास अपघात होण्याची भीती प्रवाशांनी व्यक्त केली आहे. सिमेंटचा रस्ता केला असला तरी त्याची गुणवत्ता व्यवस्थित नसल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख संतोष विशे यांनी केला आहे. गेल्याच पावसामध्ये मुरबाड शहरालगत उभारलेला उड्डाणपूलदेखील वाहतुकीसाठी खुला केला आहे. या पुलाखाली हातगाडीवाल्यांनी ठाण मांडले आहे.
पहिल्याच पावसात रस्त्याला तडे व काही ठिकाणी गळती लागल्याने बॅरिकेट लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. वैशाखरे, सावर्णे या पट्ट्यात येणाऱ्या रस्त्यावरील जुन्या मोडकळीस आलेल्या पुलावर अक्षरशः सिमेंट थापून ओबडधोबड मार्ग तयार केला आहे. मात्र मोरोशीजवळ भेगा पडल्या असून बाजूचा भरावही खचला आहे.
१४ वर्षापूर्वी झालेल्या बस अपघातात ३२ जणांचा बळी
माळशेज घाट मृत्यूचा सापळा बनला आहे. याचे प्रत्यंतर २ जून २०१२ या दिवशीच आले होते. भगवानगड-विठ्ठलवाडी ही बस धोकादायक वळणावरील निकृष्ट दर्जाच्या संरक्षक भिंतीवर आदळून खोल दरीत कोसळली. या अपघातात ३२ जणांचा बळी गेला होता. ही भीषण दुर्घटना घडूनही माळशेज घाटाची स्थिती अजूनही कायम आहे.
तहसीलदारांची कबुली
रस्त्यावरील पॅनलला तडे गेल्याची कबुली मुरबाडचे तहसीलदार अभिजित देशमुख यांनी दिली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तेथे बॅरिकेड्स उभारले असून पावसाचा जोर कमी होताच रस्त्याच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येतील, असेही त्यांनी गांगिनले
पर्यटकांना होणार त्रास
दरवर्षी पावसाळ्यात माळशेज घाटातील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी मुंबई, ठाणे व अन्य भागांतून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. घाटातील धबधबे सर्वांनाच आकर्षित करून घेतात. पण यावर्षी अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्याने तसेच काही भागांत भेगा






























































