बोगस सोने ठेवणाऱ्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दागिने खरेदीच्या बहाण्याने सोन्याच्या लॉकेटवर हातसफाई करून पळून गेलेल्याला बोरिवली पोलिसांनी अटक केली. तक्रारदार हे बोरिवली येथील एका सोन्याच्या दुकानात काम करतात. गेल्या महिन्यात त्यांच्या शॉपमध्ये महिला कर्मचारी एका ग्राहकाला सोने दाखवत होती. त्यावेळी तिला सोन्याच्या लॉकेटवर संशय आला. तिने ते लॉकेट तपासले असता ते बनावट असल्याचे उघड झाले. त्यानंतर तक्रारदार याने दुकानातील सीसीटीव्ही फुटजेची तपासणी केली असता चोरीचा प्रकार उघडकीस आला.