जोगेश्वरीत इमारतीला आग, 11 जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 जोगेश्वरी पश्चिम येथील वैशाली नगरमधील गोमती वैशाली चाळ या सहा मजली इमारतीत शुक्रवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आग लागली. इमारतीच्या तळमजल्यावरील वीज मीटर केबिनमध्ये शॉर्टसर्किटमुळे भडका उडाला. काही वेळात आग वाऱयासारखी पसरली आणि परिसरात धुराचे लोट पसरले. या घटनेत दोन कुटुंबातील एकूण 11 जण जखमी झाले आहेत. सलीम तडवी, मुमताज तडवी, युसुफ मिथा, समीरा मिथा, इरफान मिथा, बिल्कीस मिथा, मोहम्मद अमीर मिथा, हुसा मिथा, इरफान मिथा, मेहरागिझ बटावाला, अली अशद बटावालकर अशी जखमींची नावे आहेत.