
महाराष्ट्र सरकारच्या ‘ई-हक्क’ पोर्टलद्वारे आता घरबसल्या वारस नोंद करता येते. त्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही.
वारस नोंदणीसाठी मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र, सर्व वारसांचे आधारकार्ड, शपथपत्र, विहित नमुन्यातील कोर्ट फी स्टॅम्प लावलेला अर्ज लागतो.
‘ई-हक्क’ पोर्टलवर स्वतःचे युजरनेम आणि पासवर्ड तयार करा. लॉगिन करून ‘वारस नोंद’ हा पर्याय निवडा. मृत व्यक्तीची आणि कायदेशीर वारसांची संपूर्ण माहिती भरा.
आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करून सबमिट करा. अर्ज तलाठी कार्यालयाकडे जाईल. तेथे त्या अर्जाची छाननी होऊन तो मंजुरीसाठी मंडलाधिकाऱ्यांकडे जातो.
१८ व्या दिवशी सातबारावर वारसांची नावे लागतील. वारस हक्क प्रमाणपत्र व्यक्तीच्या व संबंधित व्यक्तीच्या संपत्तीवर वारस नोंद, वहिवाट आदी बाबींसाठी महत्त्वाचे असते.





























































