
मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा शहरातील उपशेट्येवाडी येथे उड्डाणपूलाच्या भरावाच्या भिंतीच्या सिमेंट काँक्रेट प्लेट ढासळत आहेत. तसेच रस्ता खचला असून त्याला भेगा पडल्या आहेत. रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
लांजा शहरातील रखडलेल्या उड्डाणपूल आणि भरावच्या भिंतीचे काम वेगाने सुरू आहे. मात्र आता भरावाच्या भिंतीचे काम तकलादु आहे का? डेडलाईन पूर्ण करण्याच्या नादात मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी आणि लांजातील स्थानिक नागरिक यांच्या जीवाशी खेळ खेळला जातो आहे का? असा प्रश्न निर्माण नागरिक विचारत आहेत.































































