
घरात घुसून महिलेची गळा आवळून हत्या केल्याची घटना नेपिअन सी रोड येथे घडली. ज्योती पवार असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
ज्योती या नेपिअन सी रोड येथील सिमलानगर येथे पतीच्या निधनानंतर एकट्याच राहत होत्या. घरकाम करून त्या आपला उदरनिर्वाह करीत होत्या. पोलिसांनी ज्योती यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. ज्योतीच्या मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला. पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असून फुटेजवरून आरोपीचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत.





























































