वरळीत अनेक ठिकाणी झाडांची पडझड, शिवसेना मदतीसाठी रस्त्यावर उतरली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने मुंबई शहराला अक्षरशः झोडपून काढले. या पावसामुळे वरळी परिसरात झाडे पडण्याच्या अनेक घटना घडल्या. तसेच काही भागांत गटारे तुंबणे, सखल भागांत पाणी साचणे व वीजपुरवठा खंडित होणे यामुळे नागरिक हैराण झाले होते. या आपत्तीग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी शिवसेना रस्त्यावर उतरली होती. त्यामुळे स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला.

वरळी बीडीडी चाळ क्र. 96 जवळ वृक्ष कोसळल्याने तीन जण गंभीर जखमी झाले, तर सात रस्ता येथील शांती नगरमध्ये झाड कोसळून काही घरांचे नुकसान झाले. या सर्व घटनांची माहिती मिळताच शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी त्यांनी बाधित नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच जी/दक्षिण विभागाच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा व अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन आवश्यक व तातडीच्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या.