
विश्वविजेत्या भारतीय संघाला आयर्लंडनंतर इंग्लंडमध्ये लाजीरवाणाऱया मालिका पराभवाला सामोरे जावे लागले. टीम इंडिया चारी सामन्यांत चीतपट झाली आणि त्यांनी आपली लाज घालवली. टीम इंडियाची इंग्लंडने पाचव्या टी 20 सामन्यातही धुलाई करत 20 षटकांत 257 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाला 201 धावांवर समाधान मानावे लागले आणि इंग्लंडने हा सामना 56 धावांनी जिंकला. यासह त्यांनी मालिका 4-0 अशी सहजपणे खिशात टाकली.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड – 20 षटकांत 3 बाद 257 (जोस बटलर 131, हॅरी ब्रुक्स नाबाद 95; प्रसिध कृष्णा 1/38) विजयी वि. हिंदुस्थान – 20 षटकांत 8 बाद 201 (ईशान किशन 56, तिलक वर्मा 53; सॅम करन 3/36)


























































