थाय बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालयाला डझनभर पदके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोरेगावमधील नूतन विद्यामंदिर संचालित महाराष्ट्र विद्यालयाने चेंबूर येथे झालेल्या विभागीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत तब्बल 12 पदांची कमाई केली. महाराष्ट्र विद्यालयाच्या उर्वी चव्हाण, ऋषिकेश चव्हाण आणि युवराज चव्हाण यांनी यावेळी सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर शाळेने पाच रौप्य आणि चार कांस्य पदके जिंकली.

महाराष्ट्र विद्यालयाने जिंकलेली पदके आणि खेळाडू पुढीलप्रमाणे – उर्वी चव्हाण – सुवर्ण पदक, ऋषिकेश चव्हाण – सुवर्णपदक, युवराज चव्हाण – सुवर्णपदक, वेदांत धुर्ये – रौप्यपदक, नितीन लांबोरे – रौप्यपदक, आराध्या बिल्ला – रौप्यपदक, मानसी निवाते – रौप्यपदक, श्रावणी जाधव – रौप्यपदक, श्रवण भुवड – कांस्यपदक, दीक्षा नाईक – कांस्यपदक, दिव्यांशी बिल्ला – कांस्यपदक, सायली डबडे – कांस्यपदक.

या सर्व खेळाडूंना गौरव पांचाळ सरांचे प्रशिक्षण लाभत आहे, तर संस्थेचे सचिव अनिल देसाई यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र विद्यालयामधील मुख्याध्यापक विष्णू मसुरकर, मुख्याध्यापिका दीपाली राऊत आणि मुख्याध्यापिका पूर्वा नाईक यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.