
जून महिन्यात किरकोळ महागाईचा दर 4.38 टक्क्यांनी वाढला आहे. सलग सहाव्या महिन्यात महागाईचा दर वाढला आहे. चिंतेची बाब म्हणजे, खाद्यान्न महागाईचा दर वाढून 5.38 टक्क्यांवर गेला आहे. गेल्या दीड वर्षामध्ये प्रथमच महागाईचा दर आरबीआयच्या 4 टक्के मर्यादा पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे व्याजदरदेखील वाढू शकतात.
केंद्र सरकारने जून महिन्यातील महागाईच्या दराची आकडेवारी आज जाहीर केली. मे महिन्यात किरकोळ महागाईचा दर 4.38 टक्के झाला आहे. जानेवारीमध्ये किरकोळ महागाईचा दर 2.74 टक्के होता. महागाईचा दर 4 टक्क्यांच्या आत ठेवण्याचे आरबीआयचे लक्ष्य आहे. त्यावर महागाईचा दर पोहोचला आहे. खाद्यान्न महागाई वाढून 5.32 टक्क्यांवर पोहोचली आहे. ग्रामीण भागात खाद्यान्न महागाई 5.45 टक्के तर शहरी भागात हा दर 5.09 टक्के नोंदविण्यात आला.




























































