नागालँडमध्ये आयईडी स्फोट, जवान शहीद’; चार जण जखमी, प्रशिक्षण केंद्राच्या ताफ्याला केले लक्ष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागालँडमध्ये शोखुवी-चुमौकेदिमा रस्त्यावर एका आयईडीचा स्फोट झाला. त्यात आसाम रायफल्सचा एक जवान शहीद झाला असून चार जण जखमी झाले.

स्फोट सोमवारी नागालँडच्या चुमौकेदिमा जिल्ह्यातील सुखोवी जवळ झाला. येथे आसाम रायफल्सचे मोठे प्रशिक्षण केंद्र आहे. हल्लेखोरांनी आसाम रायफल्सच्या वाहनांच्या ताफ्याला लक्ष्य केले. ताफ्याच्या मार्गावर आयईडी पेरून ठेवण्यात आला होता. जेव्हा सुरक्षा कर्मचारी नियमित हालचालीनुसार त्या भागातून जात होते, त्या वेळी स्फोट झाला. जखमी झालेल्या चार जवानांना तत्काळ तेथून काढून उपचारासाठी जवळच्या वैद्यकीय केंद्रात नेण्यात आले. शहीद जवानाची अद्याप ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. अद्याप कोणत्याही बंडखोर गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.