त्यांना खूप त्रास होतोय… वांगचुक यांची प्रकृती खालावल्याने झीनत अमान यांनी केंद्र सरकारला केले चर्चेचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘नीट’ पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक दिल्लीतील जंतरमंतर येथे बेमुदत उपोषण करत आहेत. बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनीदेखील त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत केंद्र सरकारला वांगचुक यांच्याशी चर्चा करण्याचे आवाहन केले आहे.

सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त समोर आल्यानंतर झीनत अमान यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्यांच्याविषयी काळजी व्यक्त केली.

झीनत अमान म्हणतात…

“आज माझे सगळे लक्ष देशाच्या राजधानीकडे आहे. कारण तिथे सोनम वांगचुक यांच्या बेमुदत उपोषणाचा आज १७ वा दिवस आहे. मी वाचले की, त्यांचे वजन खूप कमी झाले आहे आणि त्यांना खूप त्रास होतोय!

आंदोलनावर ठाम असणाऱ्या वांगचुक यांच्या इच्छेचा आदर करत मी भारत सरकारला विनंती करते की, त्यांनी देशाच्या भविष्याशी संबंधित असलेल्या या मुद्द्यावर लवकरात लवकर चर्चा सुरू करावी.”