वंदे भारत एक्सप्रेसमध्ये स्वच्छतेचा बोजवारा, पावणेतीन महिन्यांत 357 तक्रारी दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हायस्पीड आणि हायटेक म्हणून ओळख असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाल्याचे समोर आले आहे. गेल्या पावणेतीन महिन्यांत प्रवाशांनी स्वच्छतेबाबत तब्बल ३२७ तक्रारी नोंदवल्या आहेत. यामुळे वंदे भारतच्या आलिशान आणि चकाचक प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.

१ एप्रिल ते २१ जूनदरम्यान रेल्वे प्रशासनाकडे नोंदवलेल्या तक्रारींमध्ये रेल्वेचे फिरते बायो टॉयलेट्स वेळेवर स्वच्छ न करणे, डब्यांमध्ये पडलेला कचरा, अस्वच्छ सीट्स आणि अस्वच्छ भांडी व खानपान सेवेचा समावेश आहे. प्रीमियम तिकीट दर मोजूनही जर प्रवासात साधी स्वच्छता मिळत नसेल, तर या प्रीमियम सेवेचा काय उपयोग, असा संतप्त सवाल प्रवाशांनी विचारला आहे. याची गंभीर दखल घेत रेल्वे प्रशासनाने स्वच्छतेसाठी संबंधित कंत्राटदारांना सक्त ताकीद देत कारवाईचा इशारा दिला आहे.