
पाच दिवस मुसळधार पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवल्यानंतर आठवडाभर गायब असलेला पाऊस बुधवारी पुन्हा हजर झाला. बुधवारी पहाटे मुंबई ठाण्यात पावसाने हजेरी लावली त्यामुळे गरमीने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.
मुंबईत बुधवारी पहाटे पडलेल्या पावसानंतर ढगाळ वातावरण होते त्यामुळे पाऊस पडून गेल्यानंतरही वातावरणात दमटपणा होता. त्यानंतरही रिमझिम पाऊस पडत असल्याने आज तब्बल आठवडाभरानंतर मुंबईकरांनी पाऊस अनुभवला.
हवामान खात्याने आज मुंबईतील वातावरण अंशतः ढगाळ आकाश राहील तसेच दुपारनंतर शहरात आणि उपनगरांमध्ये हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह सरी कोसळण्याची शक्यता आहे असा अंदाज वर्तवला आहे.





























































