
नोएडाच्या मामुरा गावात एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी घडली. या आगीत दोन जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आगीत अंदाजे 50 कुटुंबे इमारतीत अडकली होती. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दल, पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचावकार्य सुरू केले. इमारतीत अडकलेल्या सर्व कुटुंबांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, फेज 3 पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मामुरा येथील बहुमजली इमारतीत पार्क केलेल्या इलेक्ट्रिक बाईकमधून ठिणगी पडल्याने ही घटना घडल्याची माहिती मिळते. ही आग वेगाने पसरली आणि इमारतीतून धुराचे लोट उठू लागले.
इमारतीच्या जिन्यांमध्ये आणि लॉबीमध्ये धूर पसरल्याने अंदाजे 50 कुटुंबे आत अडकली. या घटनेमुळे लोक भयभीत झाले होते. आग विझवण्यासाठी अग्नीशमन दल शर्थीचे प्रयत्न करत आहे.


























































