100 टक्के! अमेरिका लादणार जबरी टॅरिफ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या हिंदुस्थानविरोधात अमेरिकेने पुन्हा टॅरिफचे हत्यार उगारले आहे. हिंदुस्थानवर 100 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याची तयारी डोनाल्ड ट्रम्प सरकारने केली आहे. तसे विधेयकच अमेरिकी संसदेत सादर केले जाणार आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षातील खासदारांचा गट यासाठी एकत्र आल्याने 100 टक्के टॅरिफ ही केवळ औपचारिकता उरल्याचे बोलले जात आहे. यात हिंदुस्थानसह चीन, स्लोवाकिया, हंगेरी, अझरबैजान या पाच देशांचा समावेश आहे. ऑगस्टच्या आधी हे विधेयक मंजूर होईल. प्रत्यक्ष टॅरिफ किती लावायचा याचा निर्णय विधेयक मंजूर झाल्यानंतर ट्रम्प यांचे मुख्य सल्लागार घेणार आहेत.