Earthquake – गुजरातच्या कच्छमध्ये भूकंप, तीन मिनिटांत दोन धक्के

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात गुरुवारी दुपारी भूकंपाचे धक्के बसल्याने एकच खळबळ उडाली. तीन मिनिटांच्या अंतराने दोन भूकंपाचे धक्के जाणवले. पहिला भूकंप दुपारी 2.20 वाजता झाला, याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.6 होती. खावडाच्या ईशान्येला 32 किलोमीटर अंतरावर या भूकंपाचे केंद्र होते.

यानंतर अवघ्या तीन मिनिटांनी, दुपारी 2.23 वाजता, 3.2 तीव्रतेचा दुसरा भूकंपाचा धक्का जाणवला. धोलाविराच्या वायव्येला 32 किलोमीटर अंतरावर या भूकंपाचे केंद्र होते. सुदैवाने या भूकंपात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही, असे आज तकने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. कच्छ हा अत्यंत भूकंपप्रवण प्रदेश मानला जातो, जिथे वेळोवेळी सौम्य ते मध्यम तीव्रतेचे भूकंप होतात.