शिवसेनेकडून विद्यार्थ्यांना ‘गुड टच-बॅड टच’चे धडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिव विधी आणि न्यास सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी जनजागृती व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराच्या माध्यमातून शिवसेना विद्यार्थ्यांना ‘गुड टच-बॅड टच’चे धडे देणार आहे. 18 जुलै रोजी सायंकाळी 5 ते 6.30 या वेळेत अंधेरीच्या पारशी वाडा येथील शिवसेना शाखा क्रमांक 83मध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे.

बालकांमध्ये लैंगिक शोषणाविषयी जागरूकता निर्माण करणे, शरीराच्या मर्यादांची जाणीव करून देणे तसेच कोणत्याही प्रसंगी निर्भयपणे आवाज उठविण्याचे धैर्य निर्माण करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात शिव विधी व न्याय सेनेच्या उपाध्यक्षा अॅड. स्वप्ना कोदे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्व पालकांनी आपल्या बालकांसह उपस्थित राहण्याचे आवाहन शिव विधी आणि न्यास सेना तसेच महिला शाखा संघटक स्नेहल महाडिक यांनी केले आहे.