. शिवाजी पार्क शिवतीर्थावरून हा मोर्चा निघेल आणि हा मोर्चा जाईल सिद्धीविनायकाकडे. तिथे जाऊन आम्ही देवाला साकडे घालणार आहोत की या सरकारला सुबुद्धी मिळो आणि यासाठी त्याची सांगता करणार आहोत.
आम्ही 26 जुलैला एक मोर्चा काढणार आहोत. मुंबईसारख्या सर्वात महत्त्वाच्या शहरात मुलं, पालक एकत्र येताहेत आणि राग, रोष व्यक्त करताहेत हे केंद्राला कळणे गरजेचे आहे.
ज्या प्रकारे देशामध्ये गोष्टी सुरू आहे त्याच्याबद्दलचा राग आहे आणि तो राग सगळे जण व्यक्त करत आहेत.
आधी मुलं आत्महत्या करताहेत आणि त्यांचा सगळा जो राग आहे, त्या विद्यार्थ्यांबरोबर इतरही लोक आंदोलनात आलेले आहे. हा एकूणच व्यवस्थेविरूद्धचा राग आहे.
माझा एक जुना व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. पंतप्रधानांशी मी नीटच्या परीक्षेबद्दल बोललो होतो. मी त्यांना त्यावेळी सांगितले होते की आज शेतकरी आत्महत्या करताहेत, उद्या विद्यार्थी आत्महत्या करतील आणि तेच झाले.
माझा एक जुना व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. पंतप्रधानांशी मी नीटच्या परीक्षेबद्दल बोललो होतो. मी त्यांना त्यावेळी सांगितले होते की आज शेतकरी आत्महत्या करताहेत, उद्या विद्यार्थी आत्महत्या करतील आणि तेच झाले.
नीटची परीक्षा द्यायला किती कष्ट असतात, किती त्रास असतो हे त्या मुलांना विचारा एकदा.
ग्रामीण भागात आदिवासींची आंदोलनं होत आहे तिकडे लक्ष द्यायला वेळ नाही. ही कसली सत्ता आणि हा कुठला सत्तेचा माज. ही मुलं असं काय मागत होती.
शेतकऱ्यांचे आंदोलन झाले तेव्हाही ते कुणाला भेटायला तयार नव्हते. हे पण तसेच मोडायचा प्रयत्न केला. मणिपूरच्यावेळेला तेच प्रकरण झाले. अनेक आंदोलन होताहेत…
ज्या प्रकारे मुलांना मारले गेलंय आता हाप्रश्न प्रधानांपुरता मर्यादित न राहता पंतप्रधानांपर्यंत गेला आहे. त्याच्यामुळे गृहखाते, पंतप्रधानांनी आज ट्विट केले आहे. त्या ट्विटला काही अर्थच नाही.
हे काय पहिल्यांदा नीटचे पेपर फुटले नव्हते. ही तिसरी वेळ आहे. नीट परीक्षा आणली त्याचवेळी आम्ही विरोध केला होता त्या गोष्टीला. केंद्रीय पद्धतीने परीक्षा घेऊन नका. पण ते सत्ताच एवढी होती त्यावेळी कुणाचे ऐकायचे त्यांची तयारी नव्हती आणि आजही नाही.
साधारणपणे पदाची जेव्हा जबाबदारी घेता तेव्हा पदामधून आलेल्या अपयशाची जबाबदारी तुम्हीच घेतली पाहिजे हीच खरी तर मागणी आहे. हीच मागणी होती त्या मुलांची.
मुंबईमध्ये ज्यावेळी कसाब आला, 26-11 प्रकरण झाले तेव्हा आरआर पाटील असे म्हणाले की, बडे बडे शहरो मे छोटी बाते होती रहती है. या एका वाक्यवरून त्यांना गृहमत्रीपदावर काढून टाकण्यात आले होते.
या सगळ्या प्रकरणामध्ये आजपर्यंत भाजप ज्यावेळी विरोधामध्ये होता तेव्हा त्यांनी अनेक मंत्र्यांचे राजीनामे मागितले होते.
हे संपूर्ण आंदोलन शांततापूर्ण होते आणि ज्या प्रकारे केंद्रातून मुला, मुलींवर दबाव आणला जातोय, मारले जाते आणि त्याचे सगळे परिणाम हे संपूर्ण देशभर उमटत आहेत.
गेले काही दिवस जे विद्यार्थ्यांचे आंदोलन देशात सुरू आहे, आणि ते कशाप्रकारे चिरडण्याचा प्रयत्न सुरू आहे- राज ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद सुरू-