मोदीजी, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या नाहीतर विषय तुमच्या राजीनाम्यावर येईल; अभिजीत दिपकेंचा पंतप्रधानांना इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो की त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा. नाहीतर हा विषय फक्त धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापुरता मर्यादित राहणार नाही तो तुमच्या राजीनाम्यावर येईल, असा इशारा कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला आहे. आज जंतरमंतर येथे आंदोलकांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

”एक अकार्यक्षम मंत्री देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांपेक्षा जास्त महत्त्वाचा असू शकत नाही. पण जर तुम्ही त्या अकार्यक्षम, अयशस्वी मंत्र्याला कोट्यवधी विद्यार्थ्यांपेक्षा जास्त महत्त्वाचे समजत असाल तर भविष्यात या हिंदुस्थानची जनता येत्ना निवडणूकांमध्ये तुम्हाला मतदान करणार नाही”, असे देखील दिपके यांनी म्हटले आहे.