
नीट पेपरफुटीविरोधात आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाविरोधात देशातील वातावरण तापले आहे. एकीकडे दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलानाला विरोधी पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. हजारो विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. तर दुसरीकडे देशातील विविध भागात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. विद्यार्थी उत्स्फुर्तपणे रस्त्यावर उतरत आहेत. विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना सत्ताधाऱ्यांना करावा लागत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनाही विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे उमरगा तालुक्यातील मुरूम येथे आले असता त्यांच्यात ताफ्या समोरच आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपा विरोधात घोषणाबाजी केली. pic.twitter.com/QorNxTn1KH
— Saamana Online (@SaamanaOnline) July 23, 2026
दिल्ली येथील जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी विविध संघटनाच्या वतीने धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे उमरगा तालुक्यातील मुरूम येथे आले असता त्यांच्यात ताफ्या समोरच आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपा विरोधात घोषणाबाजी केली. भाजप हटाओ, देश बचाओ… जब जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है…कायर है कायर है, नरेंद्र मोदी कायर है… धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो.. अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आंदोलन आणि विद्यार्थ्यांचे आक्रमक रुप पाहून रवींद्र चव्हाण यांनी तिथून अक्षरश: पळ काढला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.































































