धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, नाहीतर पंतप्रधानांच्या राजीनाम्याची वेळ येईल! अभिजित दीपके यांचा इशारा 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱया अकार्यक्षम मंत्र्याची हकालपट्टी झालीच पाहिजे. मोदीजी, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तत्काळ राजीनामा घ्या नाहीतर थेट पंतप्रधानांच्या राजीनाम्याची वेळ येईल, असा इशारा आज कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दीपके यांनी दिला आहे. आगामी निवडणुकांमध्ये देशातील एकही नागरिक तुम्हाला मतदान करणार नाही, असा घणाघातही दीपके यांनी केला आहे.

पेपरफुटीमुळे त्रस्त झालेल्या तरुण विद्यार्थ्यांपेक्षा एक अपयशी आणि अकार्यक्षम मंत्री सरकारसाठी अधिक महत्त्वाचा असू शकत नाही. मोदीजी, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या नाहीतर तुमच्यावर राजीनाम्याची वेळ येईल, असे दीपके यांनी बजावले. विद्यार्थ्यांच्या भावनेचा सन्मान केला नाही आणि शिक्षण मंत्र्यांचा बचाव केला तर देशातील तरुण वर्ग शांत बसणार नाही. मतपेटीच्या माध्यमातून सरकारला योग्य उत्तर दिले जाईल.

सरकारने चर्चेसाठी जंतरमंतरवर यावे

सरकारने चर्चेसाठी जंतरमंतरवर यावे किंवा एखाद्या तटस्थ स्थळाची निवड करावी. आम्ही कोणाच्याही घरी किंवा कार्यालयात चर्चेसाठी जाणार नाही, अशी ठाम भूमिका कॉक्रोच जनता पार्टीने घेतली.