ठाणे महानगरपालिका ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनेला सर्वसाधारण विजेतेपद; 12 सुवर्ण, 10 रौप्य आणि पाच कांस्यपदकांची कमाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाणे जिल्हा कनिष्ठ ऍथलेटिक्स स्पर्धा मौलाना अब्दुल कलाम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कौसा-मुंब्रा येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ठाणे महानगरपालिका ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनेने तब्बल 12 सुवर्णांसह एकूण 27 पदकांची दमदार कमाई केली. त्यामुळेच या स्पर्धेत ठाणे महानगरपालिका ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनेला सर्वसाधारण विजेतेपद पटकावता आले. या खेळाडूंना निलेश पाटकर यांचे प्रशिक्षण मिळत आहे.

ठाणे महानगरपालिका ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनेने पटकावलेली पदके पुढीलप्रमाणे

14 वर्षांखालील मुली ः काव्या कांगले – 100 मीटर आणि ट्रायथलॉन ‘अ’ – सुवर्णपदक.
इरा जाधव – ट्रायथलॉन ‘क’ – सुवर्णपदक.
सई पालांडे – 100 मीटर आणि ट्रायथलॉन ‘ब’ – रौप्यपदक. दूर्वा रास्ते – ट्रायथलॉन ‘ब’ – कांस्यपदक.
16 वर्षांखालील मुली ः रिसा फर्नांडिस – 60 मीटर आणि लांब उडी – रौप्यपदक.
18 वर्षांखालील मुली ः कानन देसाई – 400 मीटर – सुवर्णपदक आणि 200 मीटर – रौप्यपदक.
20 वर्षांखालील मुली ः श्रेष्ठा शेट्टी – 100 मीटर – रौप्यपदक. श्रुती फांसे – 1500 मीटर – रौप्यपदक आणि 800 मीटर – कांस्यपदक.
14 वर्षांखालील मुले ः आरव विनेरकर – 100 मीटर आणि ट्रायथलॉन ‘क’ – रौप्यपदक. स्वराज पाटील – 100 मीटर – कांस्यपदक.
16 वर्षांखालील मुले ः अनिरुद्ध नंबूदरी – 600 मीटर – सुवर्णपदक आणि 60 मीटर – कांस्यपदक.
धैर्य सूर्यराव – 60 मीटर – सुवर्णपदक आणि लांब उडी – कांस्यपदक. स्नेह कामेरकर, धैर्य सूर्यराव, ध्रुव शिरोडकर आणि अनिरुद्ध नंबूदरी – मेडली रिले – सुवर्णपदक.
18 वर्षांखालील मुले ः मानस शिंदे – 200 मीटर आणि 400 मीटर – सुवर्णपदक. नागेश सावंत – उंच उडी – सुवर्णपदक. तनिष लोटणकर – 400 मीटर – रौप्यपदक. अभिज्ञान डे – उंच उडी – कांस्यपदक. विघ्नेश मुदलियार, तनिष लोटणकर, नागेश सावंत आणि मानस शिंदे – मेडली रिले – सुवर्णपदक.
20 वर्षांखालील मुले ः गिरीक बांगेरा – 800 मीटर – सुवर्णपदक आणि 400 मीटर – रौप्यपदक.
‘खेळाडूंनी आपल्या क्षमतेनुसार उत्तम कामगिरी केली आहे. ज्युनियर हंगामाची ही एक चांगली सुरुवात आहे. आता आम्ही राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तयारी सुरू करू, असे ठाणे पालिकेच्या मीनल पालंदे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर योजनाप्रमुख अशोक आहेर यांनी सर्व खेळाडू व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आणि आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.