निर्मलाताईंचे वेगळेच काही तरी…म्हणे, फेरपरीक्षेत कामगिरी सुधारली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीट पेपरफुटीवरुन देशभरात आंदोलन सुरू झाले असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न करताना, नीट फेरपरीक्षेत विद्यार्थ्यांची कामगिरी सुधारल्याचा दावा केला.

तरुणाई मोदी सरकारविरोधात रस्त्यावर उतरली असताना निर्मला सीतारामन यांनी वेगळाच राग आळवला. सीतारामन म्हणाल्या की, नीट फेरपरीक्षा सुरळीत पार पडली. परीक्षेचा निकालदेखील वेळेवर जाहीर करण्यात आला. तरुण विद्यार्थी पुढे येऊन म्हणत आहेत की, पेपर फुटला त्यावेळी वाईट वाटले. मात्र, आम्ही नव्या जोमाने तयारी करत संधीचा फायदा घेतला आणि कामगिरी सुधारली, असा दावा सीतारामन यांनी केला.