
नीट पेपरफुटीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. मोदींनी आधी ट्विट केले आणि नंतर मध्यरात्री एक व्हिडीओ जारी करत दोषींवर कठोर कारवाई करू, तसेच नवीन विधेयक आणू अशी घोषणा केली. या व्हिडीओ आता विरोधक तुटून पडले आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा व्हिडीओ रिपोस्ट करत मोदींवर हल्ला चढवला आहे. मध्यरात्री पोस्ट केलेल्या या सुमार दर्जाच्या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांच्या समजुतीचा अपमान करू नका, असा टोला राहुल गांधी यांनी मोदींना लगावला.
मिस्टर मोदी, आमले विद्यार्थी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मध्यरात्री पोस्ट केलेल्या या सुमार दर्जाच्या व्हिडिओद्वारे त्यांच्या समजुतीचा अपमान करू नका, असे राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी तीन मागण्यांचाही पुनरुल्लेख केला. पहिली मागणी धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवा, दुसरी मागणी विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा आणि तिसरी मागणी विद्यार्थ्यांची माफी मागा, अशी आहे.
Mr. Modi, our students are demanding Dharmendra Pradhan’s resignation.
Don’t insult their intelligence with this pathetic midnight video.
1. Sack Pradhan.
2. Punish those who beat students.
3. Apologise https://t.co/7SLB6pQqZx— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 23, 2026
दरम्यान, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत सरकारने घेतलेल्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. विद्यार्थ्यांनी सरकारकडे जबाबदारी निश्चित करण्याची आणि शिक्षणव्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी केली आहे. मात्र, मोदी सरकारने त्यांच्या धाडसाला भ्याडपणा आणि क्रौर्यानं उत्तर दिलं. सरकारने विद्यार्थ्यांकडे देशाचं भविष्य घडवणारे नागरिक म्हणून न पाहता, त्यांना देशाचे शत्रू असल्याप्रमाणे वागणूक दिली आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, मोदी सरकारने देशाची शिक्षण व्यवस्था कमकुवत केली. तसेच, देशातील विद्यार्थ्यांनी मोदी सरकारच्या दाव्यांचा आणि अहंकाराचा फुगा फोडला. विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि त्यांच्या भविष्याचं संरक्षण करणं ही आपली नैतिक, राजकीय आणि घटनात्मक जबाबदारी आहे. ‘द हिंदू’मध्ये याबाबत त्यांनी एक सविस्तर लेख लिहिला आहे.
“The Narendra Modi government has responded to the students’ courage with cowardice and wanton cruelty, treating them not as inheritors of the future but as enemies of the nation.
The Modi government has not just degraded India’s education landscape but has also made a habit of… pic.twitter.com/dE42K1f90b
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 24, 2026



























































