आरोग्य – भाज्यांचे महत्त्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. आशुतोष कुलकर्णी

आपल्या आहारातील महत्त्वाचा घटक म्हणजे भाज्या. भाज्यांची रस प्रवृत्ती, गुणधर्म जाणून घेऊया.

सध्या लेटय़ूसच्या पानांनी अमेरिकेत धुमाकूळ घातलाय. कच्च्या भाज्या खाण्याच्या अतिरेकाने पोट बिघडवणारा बॅक्टेरिया तिथे त्रास देतोय. आयुर्वेद कच्च्या भाज्या खायला कधीही सांगत नाही. उलट भाज्या योग्य प्रकारे शिजवून खाव्यात असेच सांगतो. ऋतूनुसार येणाऱया रानभाज्या तर आवर्जून खायला सांगितल्या आहेत. भारंग, कोरळ, करटुले, शेवळे, कुडय़ाची फुले अशा अनेक प्रकारच्या रानभाज्या बाजारात मिळतात. त्या योग्य पद्धतीने शिजवून खाल्ल्या तर आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, पण योग्य प्रमाणात खाल्ले पाहिजे. भाजीपाला म्हणून रोजच्या जेवणात वापरल्या जाणाऱया अनेक वनस्पती औषधी गुणधर्मांनीही समृद्ध असतात. काही सामान्य भाज्यांचे औषधी महत्त्व पुढीलप्रमाणे आहे:

पालक (Palak / Spinach) : पालक आपल्या रोजच्या आहारात असलेली भाजी. पाने उकडून किंवा अनेक प्रकारे शिजवून बटाटा, पनीर यासोबत खाल्ली जातात. थोडी कडवट चव असली तरी रक्ताचे प्रमाण वाढवून अशक्तपणा (अॅनिमिया) कमी करण्यास मदत करतात. बद्धकोष्ठता व पोटाच्या वेदनांमध्ये उपयोगी ठरते.

मुळा : ही संपूर्ण वनस्पती भाजी म्हणून वापरली जाते. कावीळमध्ये पांढऱया मुळ्याचा रस अत्यंत गुणकारी आहे. याने वात (गॅस) कमी होतो आणि या वातनाशक गुणधर्मांमुळे बद्धकोष्ठता दूर करतो.
लाल भोपळा : फळे, फुले या सर्वांचा वापर भाजी म्हणून केला जातो. भरपूर फायबर असल्यामुळे बद्धकोष्ठ कमी करणारा तसेच काही अंशी उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे असे काही संशोधनात आढळून आले आहे.

कारले : फळभाजी म्हणून वापरले जाते. कावीळमध्ये फायदेशीर ठरते.

रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. मधुमेहाची लक्षणे कमी करण्यास उपयुक्त आहेत.

artical by ashutosh kulkarni on health-benefits-of-vegetables-in-ayurveda पाने व बिया भाजी म्हणून वापरल्या जातात. अरुची, ज्वरव्याधीमध्ये उपयोगी आहे, परंतु अतिसेवनाने आम्लपित्त, अंगावर पित्त उठणे इत्यादी समस्या निर्माण होतात. त्यामुळे योग्य प्रमाणात खावे.

मेथीची पाने अल्सरसाठी लाभदायक मानली जातात.

शेवगा : शेवगा हा मेंदू विकारांसाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. नवीन संशोधनानुसार बुद्धिभ्रंशसारखे आजार होऊ नयेत म्हणून शेवगा पानांचा वापर केला जातो. शेंगा, कोवळी पाने, फुले यांचा भाजी म्हणून वापर केला जातो.
यात प्रतिजैविक असे प्रभावी गुणधर्म आहेत. प्रथिनांचे समृद्ध स्रोत आहेत. संधिवातावर (Rheumatism) हा उपयोगी आहे. तसेच विषारी प्राण्यांच्या चाव्यांमध्ये उपयोग करण्याची शिफारस केली जाते. शेंगा हृदयाला उत्तेजना देतात. जीवनसत्त्वांचा चांगला स्रोत असून रक्ताभिसरण सुधारतात.
आतडय़ांतील कृमी नष्ट करण्याचे गुणधर्म आहेत. फुले टॉनिक व लघवीचे प्रमाण वाढवणारे JeCeejs (Diuretic) म्हणून वापरली जातात.

गवार : गवारीच्या शेंगा भाजी म्हणून वापरल्या जातात. त्यातील औषधी गुणधर्मामुळे त्वचा विकार, पोटाचे विकार, मधुमेह अशा विविध आजारांवर गुणकारी आहे.

रताळे : आपल्याकडे उपवासासाठी लोकप्रिय असलेले रताळे हे बटाटय़ापेक्षा अधिक आरोग्यदायी आहे. उकडून किंवा भाजून अन्न म्हणून वापरले जाते. पाने भाजी म्हणून वापरता येतात. प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्त्वे व खनिजे यांचा समृद्ध स्रोत आहेत. रेचक व शीतल गुणधर्म आहेत. कामोत्तेजक (Aphrodisiac) म्हणूनही उपयोगी आहे.

प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, खनिज द्रव्ये व जीवनसत्त्वे यांचा समृद्ध स्रोत आहेत.

भूक वाढवणारे, आमांशरोधक व वातनाशक गुणधर्म यात आहेत. शरीरातील जळजळ व गाठी यामध्येही उपयोगी आहे.
अशा अनेक भाज्या आपण जेवणात वापरतो. त्यांचा उल्लेख एका लेखात करणे शक्य नाही. ताटात वाढलेल्या इतर पदार्थांच्या तुलनेत अधिक प्रमाणात खावी या उद्देशाने उजव्या बाजूला वाढली जाणारी भाजी आपण खाल्ली पाहिजे. आरोग्यदायी आहार हेच सर्वोत्तम औषध मानले जाते. औषधी गुणधर्म असलेल्या भाज्या आहार तसेच उपचार या दोन्ही उद्देशांसाठी वापरल्या जातात. या भाज्या शरीराच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक पोषक घटक पुरवतात. त्यांच्या पोषक तत्त्वांत आणि चवीत वाढ होण्यासाठी आपल्या पाक संस्कृतीत विविध फोडण्या, डाळी, पीठ वापरले जातात. अशा भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फ्लॅव्होनॉईड्स, ग्लायकोसाईड्स इत्यादी जैव सािढय घटक असल्यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.

[email protected]