सीरियात दोन प्रवासी बसमध्ये धडक; अपघातात 35 जण ठार, अनेक जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य सीरियामध्ये दोन प्रवासी बसच्या धडकेत 35 जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. पल्मायरा आणि अल-सुखना या शहरांदरम्यानच्या महामार्गावर हा अपघात घडला. हा महामार्ग देशाच्या पूर्व भागाला राजधानीशी जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, अपघातग्रस्त एका बसमध्ये सुरक्षा दलाचे जवान होते तर दुसऱ्या बसमध्ये नागरिक होते. जखमींना हेलिकॉप्टरच्या मदतीने लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खराब रस्त्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते.