मुसळधार पावसामुळे पहलगाम मार्गावरील अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुसळधार पावसामुळे पहलगाम मार्गावरील अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. पावसानंतर आवश्यक देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अमरनाथ यात्रा बालटाल मार्गावरून सुरू राहील, असे कश्मीरचे विभागीय आयुक्त अंशुल गर्ग यांनी सांगितले.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अलीकडे झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पहलगाम मार्गावर तातडीने दुरुस्ती आणि पुनर्स्थापनाची कामे करणे गरजेचे झाले होते. यात्रा अखंडपणे सुरू राहावी यासाठी, बालताल मार्गावर भाविकांच्या सुरक्षित आणि सुरळीत प्रवासासाठी सर्वसमावेशक व्यवस्था करण्यात आली आहे, असे गर्ग यांनी नमूद केले. या वर्षीच्या यात्रेदरम्यान आतापर्यंत 3.95 लाखांहून अधिक भाविकांनी पवित्र अमरनाथ गुहेतील तीर्थस्थळाचे दर्शन घेतले, असे त्यांनी पुढे सांगितले.